वय वर्ष ३ ते ५ या वयोगटातील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देणारे शैक्षणिक संकुल म्हणजे ज्ञानगंगा विश्व विद्यालय सेमी पूर्व प्राथमिक विभाग.
नाविन्यपूर्ण वैचारिक क्षमता असलेली जिज्ञासू आणि परिपक्व पिढी घडवणे हे एक पवित्र कार्य आहे ही भारताची खरी संपत्ती आहे विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांचा विकास करून त्याला शैक्षणिक समृद्धता देणे त्यांच्यातील कला गुण प्रतिभा यांचा शोध घेऊन विकास करणे समाजात एक संस्कारशील विद्यार्थी म्हणून त्याची ओळख निर्माण होणे आणि त्याचे भविष्य उज्वल होण्यासाठी तसेच ज्ञानगंगा विश्वविद्यालयातील सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी त्याला लहान वयातच योग्य सवयी लावणे संस्कार रुजवणे आवश्यक असतात यासाठी प्राथमिक विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.
इयत्ता ५वी ते १०वी चे विद्यार्थी म्हणजेच .....भविष्यातील स्थितीजाकडे वाटचाल करणारे विद्यार्थी ज्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला दिशा देण्याचे महत्वाचे कार्य ज्ञानगंगा विश्व विद्यालयात केले जाते. विज्ञानाधिष्ठीत विचारसरणी. आणि संस्कारशील विद्यार्थी घडवण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन शाळेत होते.स्पर्धा परीक्षेची तयारी शाळेतच व्हावी यासाठी स्पर्धा परीक्षा टेऊन यशस्वी झालेल्या मार्गवर्गांचे मार्गदर्शन व्याख्याने आयोजित केले जातात.देशाचे आदर्श नागरिक घडवत शिस्तप्रिय विद्यार्थी घडवणे हेच ज्ञानगंगा शाळेचे ध्येय आहे